जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांची कोन प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

*भिवंडी तालुक्याचा माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा घेतला आढावा*

ठाणे : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गतिमान पावलं उचलली जात आहेत. या मोहिमे अंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते या ग्रामीण भागातील विविध गावांना, प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन मोहिमेचा आढावा घेत आहेत. त्यांनी आज भिवंडी तालुक्याचा दौरा करत प्राथमिक आरोग्य केंद्र कोन आणि कोन ग्रामपंचायत येथे भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण तालुक्याचा माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतला.
मोहिमे अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणातून एकही कुटुंब सुटणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यात अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप केले जात आहे. या उपक्रमाचाही त्यांनी आढावा घेतला. त्यांच्या उपस्थितीत गावातील नागरिकांना  अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे  वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग चौरे, कोन गावाच्या सरपंच डॉ. रुपाली कराले, ग्रामस्थ उपस्थित होते.
भिवंडी तालुक्यात १ लाख २९ हजार १४० कुटुंब असून ५ लाख ५१ हजार ४१८ लोकसंख्या आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत सर्वेक्षण करण्यासाठी १८२ पथकांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यासाठी ५४६ कर्मचारी कार्यरत आहेत. आतापर्यंत   १ लाख ७८ हजार ३३२  नागरिकांचे सर्वेक्षण तर ४४ हजार १४१ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे.

 392 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.